कला व सांस्कृतिक या संवर्गातील जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी :

  1. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या वतीने संगीत व नृत्य कला प्रकारासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण/प्राविण्य प्रमाणपत्राची प्रत.
  2. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचानालयामार्फत आयोजित केलेल्या बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनयाचे प्रमाणपत्र.
  3. चित्रकला प्रमाणपत्र असलेले विद्यार्थी : चित्रकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी त्याबाबतचे शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्र अथवा त्यांच्याच शाळेच्या मुख्याध्यापकाकडून सादर परीक्षा उत्तीर्ण असले बाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे व ते या कोट्यातील आरक्षणासाठी सादर करावे.