क्रीडा

क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने इयत्ता ८ वि , ९ वि, किंवा १० वि मध्ये शिकत असताना सदरहू स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य प्राप्त केले असले पाहिजे.
  1. शासन निर्णय दि. २६ जून १९९७ नुसार कला व क्रीडा क्षेत्रात जिल्हा/राज्य/राष्ट्रीय पातळीवर प्रथम वा व्दितीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी.
  2. भारतीय शालेय खेळ महासंघ व भारतीय खेळ प्राधिकारांद्वारा स्पर्धेमध्ये विभागीय स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू, राष्ट्रीय / राज्य स्पर्धेतील सहभागी खेळाडू.
  3. तसेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा एकविध खेळांच्या मान्यताप्राप्त संघटनेने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये राज्यस्तर अधिकृत अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू/राज्य अधिकृत स्पर्धेतील सहभागी खेळाडू.
(उक्त स्पर्धेचे प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी/विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे.)