बदलीने आलेल्या राज्यशासन / केंद्रशासन / खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पाल्य:

या आरक्षणातंर्गत बादलीने आलेले कर्मचारी या संवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाची बदली दि. ०१ ऑक्टोबर २०१६ किंवा तदनंतर झालेली असावी तसेच बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्याने लातूर महानगरपालिका क्षेत्र बाहेरून इ. १० वि किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

याबाबत कर्मचाऱ्याचे बदली आदेश व बदलीच्या ठिकाणी रुजू आदेश प्रवेशाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.